पुणे : फूल व्यापार्‍यांची झाली ‘दिवाळी’; सव्वाचार कोटी रुपयांची उलाढाल | पुढारी

पुणे : फूल व्यापार्‍यांची झाली ‘दिवाळी’; सव्वाचार कोटी रुपयांची उलाढाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘ऐन दिवाळीच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या फुलांच्या शेतीला फटका बसला. परंतु, दिवाळीच्या शेवटच्या दोन दिवसांत चांगल्या मालामुळे फुलांना बाजारभाव चांगला मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढाल दीड कोटी रुपयांनी वाढली असून, या वर्षी 4 कोटी 21 लाख रुपयांची फुलांची उलाढाल झाली,’ अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकार्‍यांनी दिली.

मार्केट यार्ड येथील फुलबाजारामध्ये झेंडूची 3 लाख 63 हजार 465 किलो आवक झाली. त्यातून 1 कोटी 81 लाख 73 हजार 250 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. गुलछडीची ही 26 हजार 775 किलोची आवक झाली असून, 53 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. गेल्या वर्षी झेंडूची 4 लाख 54 हजार 470 किलोची आवक आणि 1 कोटी 13 लाख 61 हजार 750 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती, तर गुलछडीची 33 हजार 820 किलोंची आवक झाली असून, 30 लाख 43 हजार 800 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

फुलांचा प्रकार आवक (किलोमध्ये) उलाढाल (रुपयांत)
झेंडू 3 लाख 63 हजार 465 1 कोटी 81 लाख 73 हजार 250
गुलछडी 26 हजार 775 53 लाख 55 हजार
तुळजापुरी 21 हजार 883 7 लाख 65 हजार 905
शेवंती पांढरी 1 लाख 87 हजार 566 1 कोटी 31 लाख 29 हजार 620
सुट्टा आष्टर 24 हजार 500 42 लाख 87 हजार 500
बिजली 4 हजार 388 3 लाख 94 हजार 920

या वर्षीच्या दिवाळीत परतीच्या पावसाचा शेतकर्‍यांच्या मालाला फटका बसल्याने खराब मालाचे प्रमाण अधिक होते. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांच्या बाजारात आर्थिक उलाढाल चांगली झाली.

– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी  उत्पन्न बाजार समिती

दिवाळीच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकर्‍यांच्या मालाला फटका बसला. मात्र, ऐन दिवाळीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. त्यातही दिवाळीच्या शेवटच्या दोन दिवसांत मालाची प्रत ही चांगली होती. चांगल्या प्रतीच्या मालाला चांगला भाव मिळाला असून, हलक्या प्रतीच्या मालाला फटका बसला.
                                                                            – अरुण वीर, फुलांचे

Back to top button