

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : विजेचा शॉक लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेपूर (ता. जामनेर) येथे घडली. ऐन दीपावलीच्या दिवशीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश प्रकाश नेमाडे (वय ४५, रा. कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (वय ४०, रा. टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मृत वायरमनची नावे आहेत. गणेश हा अनुकंपाखाली नोकरीला लागला होता. फत्तेपूर गावानजीक एका शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप आल्याने गणेश आणि सुनील हे तिथे पोहचले. या तारेला हात लावताच गणेश याला शॉक लागला आणि तो जागीच ठार झाला. तर रुग्णालयात घेऊन जात असतानाच सुनील याचा रस्त्यात मृत्यू झाला. गणेश याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
हेही वाचा