दीपोत्सव : नांदगाव बाजारपेठ बहरली; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग | पुढारी

दीपोत्सव : नांदगाव बाजारपेठ बहरली; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा
दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा. दीवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव बाजारपेठ बहरली असून, खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे. तसेच सणाच्या निमित्ताने गुंतवणूकीसाठी सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यासाठी दिवाळीचा मुहूर्त साधून धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करणाऱ्यांची संख्येतही वाढ दिसून येत आहे.
त्यातच खास महिलांसाठी कमी वजनाचे व सणाच्या पार्श्वभूमीवर गिफ्ट-ऑफरमुळे आकर्षक दागिने उपलब्ध झाल्याने गृहीणी आपल्या बजेटमध्ये सोने खरेदीसाठी महिला वर्गाची संख्या अधिक दिसून येत आहे. यामध्ये  दिवाळीनिमित्त इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सराफ बाजार, कपडेलत्ते यांसह घराच्या सजावटीसाठीच्या साहित्याने शहरातील दुकाने फुलून गेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे लागलेले ग्रहणही दूर झाल्याने, प्रथमच दिवाळी सणाचा उत्सव बाजारपेठांमधील खरेदीच्या लगबगीतून दिसून येत आहे. वसुबारसने दिवाळी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिवाळी सणानिमित्त बनविण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांसाठी आवश्‍यक बाजार खरेदीसाठी सुपर मार्केट, किराणा दुकानामध्ये गर्दी दिसून येत आहे. सणानिमित्त घरामध्ये नवनवीन इलेक्‍ट्रानिक वस्तू, सोने, कपडे आदी प्रमुख खरेदीसाठी शहरातील छोट्या- मोठ्या बाजारपेठांत ग्राहक गर्दी करताना दिसत आहे.
व्यवासायिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर दुकाने थाटली असून यामुळे शहरातील महात्म्या गांधी चौक, महात्मा फुले चौक, भेंडी बाजार, सराफ गल्ली, भगवान महावीर मार्ग, शनीमहाराज पंटागण या मुख्य बाजारपेठेत सणानिमित्त लागणारे घराघरावर होणारी रोषणाई, पणत्यांची आरास, आकर्षक रांगोळी, आकाश कंदील, दारावरील तोरण, लक्ष्मीपूजन व पाडव्यासाठी आवश्‍यक पूजा साहित्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघावयास मिळत आहे. कपड्यांमध्ये लेहंगा, शरारा, कॉटन साडी,  इरकल, झालर, यिन साडी, सह नवनवीन कपडे खरेदीसाठी कापड दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. ऑफलाइन वस्तू उपलब्ध बाजारात मिळणाऱ्या किंमतीपेक्षा ऑनलाइन किंमत कमी असल्याने ऑनलाइन शॉपिंगचा फटका बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दिसत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून जी काही पुंजी जमा केली आहे. त्यातून छोटेसे क हाेईना सर्वसामान्यांपासून सर्वजण सोने खरेदी करत असतात. त्यामुळे दोन दिवसांपासून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. – कुणाल खरोटे, सोने-चांदी व्यावसायिक नांदगाव.

हेही वाचा:

Back to top button