आरटीओ : परिवहन आयुक्त भीमनवार यांची स्वयंचलित चाचणी केंद्राची पाहणी | पुढारी

आरटीओ : परिवहन आयुक्त भीमनवार यांची स्वयंचलित चाचणी केंद्राची पाहणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट देत स्वयंचलित चाचणी केंद्राची पाहणी करून माहिती घेतली. दहा दिवसांपूर्वी विवेक भीमनवार हे महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तपदी रुजू झाले असून, दि. 15 रोजी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट दिली. यावेळी स्वयंचलित चाचणी केंद्राची त्यांनी पाहणी केली.

या केंद्रात यंत्र तपासणीमध्ये मुख्यत्वे प्रदूषण चाचणी, ब्रेक चाचणी, हेडलाइट चाचणी, वाहनांचा वेग (स्पीड लिमिट) आणि स्टेअरिंग प्ले तपासणीबाबत माहिती घेतली. वाहनांची बाह्यद़ृश्य तपासणी कशी केली जाते हेही त्यांनी जाणून घेतले. तसेच चाचणी केंद्राच्या कार्यालयाची पाहणी करून कामकाज कसे चालते, हे जाणून घेतले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, प्रभारी उपआयुक्त जितेंद्र पाटील, प्रभारी नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, प्रभारी उप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, मोटार वाहन निरीक्षक, उपमोटार वाहन निरीक्षक व स्वयंचलित चाचणी केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button