

नाशिक ; पुढारी ऑनलाईन
नाशिकमध्ये नांदूर नाक्याजवळ खासगी बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला आहे.
यवतमाळहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसला हा अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. नाशिकच्या नांदूर नाक्याजवळ हा अपघात घडला. या बसमध्ये अनेक प्रवासी असल्याची माहिती मिळत असून 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अॅम्ब्यूलन्स दाखल झाली असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींच्या उपचारात कुठलीही कमतरता भासू नये अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :