शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून हजारो कार्यकर्ते जाणार | पुढारी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून हजारो कार्यकर्ते जाणार

नाशिक :  नाशिक-शिवसेना महानगरतर्फे आज सोमवार (दि. 3) ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत होणारा दसरा मेळावा तसेच अन्य महत्वांच्या मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार असून नाशिक जिल्हा शिवसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीस मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले आहे.

दसऱ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा मेळावा ऐतिहासिक ठरणार असून या मेळाव्याला महानगरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक नेण्याचे नियोजन आम्ही केले असून त्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येईल अशी माहिती बडगुजर यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button