नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको | पुढारी

नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
कांदा बाजारभावसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने टेहरे हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

कांदाबाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कांद्याचे भाव घसरल्यामुळे किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा सरकारने बाजारात आणू नये. गेल्या काळात सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादकांना झालेल्या नुकसानाचे आकलन करुन त्याची भरपाई सरकारने त्वरित करून द्यावी. यापुढे सरकारने कांदा व्यापारात हस्तक्षेप करू नये, आदी मागण्या मांडण्यात येत आहेत. ललित बहाले यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, मामकोचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, देवा पाटील, निखील पवार, शेखर पवार, अर्जुन बोराडे आदींसह शेकडो शेतकरी महामार्गावर ठाण मांडून बसले आहेत.

हेही वाचा:

Back to top button