नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला | पुढारी

नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला

वाहेगावसाळ : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द येथील पाटे रस्ता ते म्हसोबा मंदिर पर्यंतचा प्रवास शाळकरी मुलांसाठी मोठी कसरत आहे. सुरक्षित रस्त्याअभावी येथील शाळकरी मुलांना पाण्यातूनच वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. चिमुकल्यांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. मुले घरी सुरक्षित पोहचेपर्यंत पालकांचा जीव टांगणीला असतो.

नदीला पाणी असल्याने आम्हाला मुलांना शाळेत पोहचवायला व घ्यायला जावे लागते. कधी शेतीकामामुळे शक्य न झाल्यास मुले घरी येईपर्यंत चिंता लागलेली असते. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा हीच आमची मागणी आहे.
-गौतम काळे, मंगेश काळे (पालक)

संगमनेर : वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड, आठ दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नदी पात्राच्या कडेने रस्त्याची व्यवस्था नसल्याने पात्रातूनच येथील शेतक-यांना शेतमालाची वाहतूक करावी लागते. शाळकरी मुलांनाही पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. वर्षातील सहा ते सात महिने तरी मुलांना असाच जीवघेणा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात व त्या पश्चात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी कायम असते.  त्यामुळे  शेतक-यांनाही पावसाळी शेतमाल काढता येत नाही. पर्यायाने टमाटे, शिमला आदी पावसाळी नगदी पिके घेता येत नाहीत.

याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला मात्र अद्याप दखल घेतली नाही. या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

Back to top button