धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे
Published on
Updated on

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी साईसेवा समितीचे अध्यक्ष अजय यादवराव सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साक्री तहसीलसमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते आज उपोषणाचा चौथा दिवस होता. आजच्या दिवशी उपोषणकर्त्यांनी रास्तारोको केल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. त्यानंतर अजय सोनवणेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.

भाडणे येथील पांझरा कान साखर कारखाना चालू होवून रोजगार मिळावा यासाठी साईभक्त अजय सोनवणे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. सध्या ज्यांना साखर कारखाना भाडे पट्ट्याने देण्यात आला आहे. त्यांनी साखरेचे उत्पादन करुन तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याऐवजी शंभर ते ११० कुटूंबांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न बेकायदा नोटीसीद्वारे करीत आहेत. गेल्या ४७ वर्षांपासून कारखाना साईटवर हे कामगार राहत आहेत. त्यांना हुसकावून लावण्याचा अधिकार यांना कोणी दिला असा सवाल त्यांनी केला.

साखर उत्पादनासाठी केवळ ३२ एकर जमिनीवरील कारखाना भाडे पट्ट्याने दिला आहे. उर्वरीत २४७ एकर जमिनीचा काय संबंध? कारखान्यात लाखो करोडोंची जुनाट मशिनरी पडून आहे. ती मशिनरी रात्री अपरात्री चोरट्या मार्गाने विकण्यात आली आहे. साखर कारखान्यातील उर्वरीत भंगार आणि इतर संपत्ती सुरक्षित रहावी म्हणून सुरक्षा पुरवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, २४ तास पोलिस बंदोबस्त द्यावा या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येते होते. आज आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे यांनी मध्यस्थी केली. उपजिल्हाधिकारी हे घटनास्थळी पोहचले. त्यांच्या हस्ते उपोषण सोडलं. साक्री पोलिसांनी सीसीटीव्ही बसविण्याची कारवाई करण्यात येत असल्याची तसेच कारखाना साईटवर दिवसरात्री गस्त करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news