माथाडींचे प्रलंबित प्रश्न एका महिन्यात सोडवणार : कामगार मंत्री

माथाडींचे प्रलंबित प्रश्न एका महिन्यात सोडवणार :  कामगार मंत्री

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या एका महिन्यात सोडवण्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत दिले.

माथाडी कामगार संघटनेचे नेते, माजी आ. नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील निवेदनमंत्री सुरेश खाडे यांना सादर केले होते. त्यासंदर्भात त्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आज बैठक आयोजित केली होती.

माथाडी सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची नियुक्ती करावी, सल्लागार समितीच्या वेळावेळी संयुक्त बैठका घ्याव्या, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांची भरती करावी, माथाडी मंडळात चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका याबाबत चर्चा झाली.

विविध प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना सादर केले होते. यासंदर्भात सर्व संबंधितांशी तीन तास सविस्तर चर्चा करुन त्यांनी माथाडी कामगारांचे प्रलंबित न्याय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले व अधिका-यांना सूचना मंत्री खाडे यांनी दिल्‍या.

या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उप सचिव दादासाहेब खताळ, अव्वर सचिव दीपक पोकळे, दिलीप वणिरे, सह कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, डीसीपी स्पेशल ब्रँचचे मोहन चिमटे, गृह विभागाचे उप सचिव संजय खेडेकर, पणनचे सह सचिव सुग्रीव धपाटे, पणनचे सह संचालक विनायक कोकरे, मुंबई- कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख, पणनचे मनोज वांगड, कामगार उपायुक्त व ग्रोसरी बोर्डाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, युनियनचे नेते सरचिटणीस माजी आ. नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष व आ. शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, नाशिक, पुणे विभागाचे सेक्रेटरी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news