नाशिक : निफाडला पूराच्या पाण्यात वाहून गेली तरुणी, आश्रमशाळेजवळ सापडला मृतदेह | पुढारी

नाशिक : निफाडला पूराच्या पाण्यात वाहून गेली तरुणी, आश्रमशाळेजवळ सापडला मृतदेह

निफाड/उगांव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील शिवडी येथून रानवड साखर कारखान्यावरील के. के. वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीत शिकणारी तन्वी विजय गायकवाड हिचा सोमवारी सकाळी विनता नदीपुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

तन्वी विजय गायकवाड ही सोमवारी सकाळी कॉलेजला जात असतांना ऊगाव खेडे दरम्यान असलेल्या विनता नदिच्या पुलावरुन जात असतांना मोठ्या प्रमाणात असलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने स्कुटीसह वाहून गेली. तिचा मृतदेह नदीप्रवाहात वाहत जाऊन असलेल्या संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिस मृत घोषित करण्यात आले. निफाड तालुक्यातील रुई येथील विजय गायकवाड यांची ती कन्या होती. शिक्षणासाठी शिवडी येथे मामांकडे राहुन कॉलेजला जात येत होती.

हेही वाचा :

Back to top button