नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव | पुढारी

नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या आणि अत्यंत देखण्या मूर्ती व स्थापत्यकलेतून साकारलेल्या स्वामीनारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा प्रारंभ 23 सप्टेंबर रोजी होत असून, यात 2 ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्संग सभा अशा माध्यमातून 10 दिवस भक्तीचा सुगंध गोदातिरी दरवळणार आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तीन दिवस लाइट आणि साउंड शो हे आहे. मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.

गोदावरी, कुंभमेळा यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकनगरीत दोन शतकांपूर्वी श्रीनीलकंठ ब—ह्मचारीच्या रूपात भगवान श्रीस्वामीनारायण यांचे वास्तव्या होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. बी. ए. पी. एस. संस्थेचे संस्थापक ब—ह्मस्वरूप शास्त्री महाराज हे आपले अनुयायी ब—ह्मस्वरूप योगी महाराज ऊर्फ ब—ह्मस्वरूप प्रमुखस्वामी महाराज यांच्यासह नाशिकला 1943 मध्ये आले होते. त्यांनी त्यावेळी, आज ज्याला केवडीवन म्हणून ओळखले जाते, तेथे भविष्यात भव्य आणि सुंदर असे मंदिर होईल आणि तेथे संतांचे वास्तव्य राहील, अशी भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी म्हणजे केवडीवनात आकारास आलेले अतिशय सुंदर आणि देखणे स्वामीनारायण मंदिर होय. तेच नाशिककरांच्या हृदयात आणि मनात भक्तीची ज्योत फुलवत ठेवणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा अशी
स्वयंसेवक सभेच्या रूपाने महोत्सवास 23 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता प्रारंभ होईल. 24 सप्टेंबरला नीलकंठ सभागृह महापूजा, संत संमेलन आणि जलयात्रा होईल. 25 सप्टेंबरला पूजा, प्रवेश विधी आणि महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. 26 सप्टेंबरला विश्वशांती महायाग आणि रात्री 9.15 वाजता लाइट आणि साउंड शो होणार आहे. 27 सप्टेंबरला दुपारीला 2.30 ला भव्य शोभायात्रा निघणार आहे. 28 सप्टेंबरला वेदोक्त पद्धतीने मूर्तिप्रतिष्ठापना विधी, तर रात्री 9 ला लाइट शो होणार आहे. 29 आणि 30 सप्टेंबरला पूजा, सत्संग सभा, समीप दर्शन होणार आहे. 1 ऑक्टोबरला सायंकाळी बाल-युवा दिन ही विशेष सभा होणार आहे, तर 2 ऑक्टोबरला सायंकाळी 6 ला प्रमुखस्वामी महाराज शताब्दी उद्घोष सभेने महोत्सवाची सांगता होणार आहे.

भारतीय कलाशैलीचा आविष्कार
खास भारतीय कलाशैलीत साकारलेेल्या या मंदिरातील कलामंडित स्तंभ भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीशिव तसेच श्रीस्वामीनारायण यांच्या प्रेरणादायी चरित्रांची गाथा आपल्या डोळ्यांसमोर प्रकट करतात. मंदिराची तीनही शिखरे ही कोरीव नक्षीकामाने सजलेली आहेत. घुमट आणि भव्य छतांची रचना डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिरात श्रीस्वामीनारायण, अक्षरब—ह्म श्रीगुणातीतानंद स्वामी, श्रीहरिकृष्ण महाराज, राधाकृष्ण, घनश्याम महाराज, शिव-पार्वती-गणेश, सीता-राम-हनुमान, श्रीलक्ष्मीनारायण देव, विठ्ठल-रुक्मिणी, नीलकंठवर्णी तसेच गुरुपंरपरा यांच्या कोरीव आणि कलात्मक मुर्ती स्थापित करण्यात आलेल्या आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन साधू भक्तिप्रियदास, अभयस्वरूपदास आणि महाव—तदास यांनी केले आहे.

नाशिकचे आकर्षण ठरणार
प्रमुखस्वामी महाराज यांनी 2003 मध्ये धुळे येथे एका प्रवचनात बोलताना, या मंदिराच्या उभारणीची घोषणा केली होती. नाशिक हे भारतातील प्रमुख तीर्थस्थान आहे. गोदाकिनारी तीन खंडांवर आणि तीन शिखर असलेले आणि संपूर्ण नाशिकची शोभा वाढविणारे राजस्थानच्या गुलाबी पाषाणातील मंदिर साकारायची आकांक्षा त्यांनी व्यक्त केली होती. ती आज स्वामीनारायण मंदिराच्या रूपाने आकारास आली आहे.

हेही वाचा :

Back to top button