

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे महामार्गावर बिटको महाविद्यालयाजवळील गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत असताना बांधकाम व्यावसायिक ट्रकखाली सापडून जागीच गतप्राण झाला.
राजेश दयाभाई पटेल (43, रा. गंधर्वनगरी) हे बांधकाम व्यावसायिक काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर रस्ता दुभाजक ओलांडत असताना अचानक विरुद्ध दिशेने येणार्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले व त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने ते जागीच गतप्राण झाले.
अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यानंतर काही वेळातच शहर वाहतूक पोलिस अधिकारी व उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. रहदारीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.