या निमित्ताने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन सुवर्णा जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सुवर्णा जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रामकृष्ण अहिरे, डॉ. स्वप्निल पाटील, डाॅ. अमित धोंगडे, भाजपा मंडल अध्यक्ष महिला आघाडी स्मिता कुलकर्णी, रंजना शिंदे, सिंधू पल्लार, पूजा भावसार, शैलजा भावसार, भारती भांबारे, नंदा शर्मा आदी उपस्थित होते. शिबिरात गरोदर मातांच्या तपासणी सोबतच समाधानकारक समुपदेशनही करण्यात आले. अल्पोपहार व गरोदर मातांच्या तपासणीसह त्यांच्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा देखील पुरवण्यात आल्या. यावेळी परिसरातील व आजूबाजूच्या गावातील १०३ गरोदर मातांनी या शिबिराचा लाभ घेतला व २० मातांची सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी परिचारिका व नागरिक उपस्थित होते.