जळगाव : कंडारीतील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह | पुढारी

जळगाव : कंडारीतील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील रहिवासी विजय विनायक बनसोडे (३६) हा नागसेन कॉलनी येथील घरून बेपत्ता झाला होता. मात्र त्याचा मृतदेह विहिरीत आढळला असून युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कंडारी येथील नागसेन कॉलनीतील रहिवासी विजय बनसोडे हा घर सोडून शनिवारी, दि.10 घरातून निघून गेला होता. याप्रकरणी शहर पोलिसात बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र या युवकाचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळून आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून ग्रामीण रुग्णालयात डॉ. मयूर चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृत बनसोडेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तर पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास संजय सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button