धुळे : रुग्णवाहिकेतून गो तस्करी करणारा चालक गजाआड | पुढारी

धुळे : रुग्णवाहिकेतून गो तस्करी करणारा चालक गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा

रुग्णवाहिकेचा गो तस्करीसाठी वापर होत असल्याचा प्रकार शिरपूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या रुग्णवाहिकेमधून सहा गायींची मुक्तता करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातून बोराडी मार्गे गो तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली. त्यानुसार देशमुख यांनी बोराडीकडून शिरपूरकडे येणाऱ्या मार्गावर सापळा रचत या मार्गावरील सर्वच संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासात पोलीस पथकाने एमपी ०९ एफए ४५९३ क्रमांकाची फोर्स कंपनीची रुग्णवाहिका थांबवून चौकशी केली. यावेळी रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकेमधून गुरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले. शिरपूर पोलिसांनी रुग्णवाहिका ताब्यात घेत यामधून ३६ हजार रुपये किंमतीच्या ६ गायींची सुटका करून २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर संशयित विजय पौलाद चव्हाण (२३, रा. महू ता. जि. इंदूर मध्यप्रदेश) यास अटक केली आहे.

हेही वाचा:

Back to top button