नाशिक: आंबेवाडीजवळ कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

नाशिक: आंबेवाडीजवळ कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

इगतपुरी: पुढारी वृत्तसेवा: इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडीजवळ एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवहे परिसरातील मिलेट्रीच्या हद्दीत काही महिन्यापूर्वी एका डॉक्टर महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याची घटना ताजी असतानाच आज (दि.३०) ही दुसरी घटना समोर आली आहे.

दरम्यान, आंबेवाडी येथे एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याचा उलगडा अद्याप झालेला नाही. ही घटना आज इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी परिसरात उघडकीस आली आहे. मृतदेहासह कारला आग लावल्याने ही कार देखील जळून पूर्णपणे खाक झाली आहे. कारचे दोन्ही बाजूकडील नंबर प्लेटा जळून गेलेल्या आहेत.

घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button