नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम | पुढारी

नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक व बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने व कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली दिसत असून रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढलेली आहे. या गर्दीचा फायदा विनातिकीट असणा-या फुकट्यांकडून उचलला जात असल्याचे भुसावळ मंडळातील रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या लक्षात आले आहे. त्यावर कठोर कारवाईचे पाऊल उचलून वाणिज्य विभागाचे प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.27) भुसावळ विभागात मेगा तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एका दिवसात वसूल केले तब्बल 17 लाख रुपये वसुल करण्यात आले.  तर मोहिमेत एकूण 40 टीमव्दारे 267 कर्मचारी तैनात करण्यात आले  आहेत.

मेगा तिकीट तपासणी मोहीमेत तिकीट तपासणी कर्मचारी- 156, व्यावसायिक पर्यवेक्षक- 63, आरपीएफ कर्मचारी- 48 यांचा समावेश असून वाणिज्य मंडळ प्रबंधक यांनी – भुसावळ स्टेशनवर  ACM नाशिक स्टेशनवर  ACM TC- BSL ते खांडवा विभाग, भुसावळ, नाशिक, मनमाड, खांडवा अकोला, बडनेरा या 6 स्थानकांवर तपासणी केली. तसेच इतर टीमद्वारे तपासणी व्यतिरिक्त गाड्या तपासण्यात आल्या. यामध्ये जवळपास 70 प्रवासी गाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2936 प्रवाश्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1783786 इतका दंड वसूल करण्यात आला. प्रवाश्यांनी योग्य तिकीट खरेदी करूनच रेल्वे प्रवास करण्याचे आवाहन भुसावळ विभागाचे वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी प्रवाशांना केले आहे.

या रेल्वे स्थानकावर करण्यात आली कारवाई

मनमाड – 35 – 22620 /-

नाशिक रोड – 152 – 87190/-

भुसावळ – 200 – 107030/-

खांडवा – 98 – 50840/-

शेगाव – 33 – 9510/-

बडनेरा – 24 – 8235/-

अकोला – 23 – 8095/-

ड्राइव्हमधून कमाई- 15,74,645

ड्राइव्ह व्यतिरिक्त कमाई- 2,09,141

एकूण तिकीट तपासणी दंडात्मक कारवाई = 17,83,786/-

हेही वाचा:

Back to top button