नाशिक : आर्वीत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त | पुढारी

नाशिक : आर्वीत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्काच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने महसूल बुडवून मद्य घेऊन चालेलेला कंटेनर ताब्यात घेतला आहे. पथकाने एक कोटी 23 लाख 37 हजार 920 रुपये किंमतीचे 15863 बॉक्स, पाच हजारांचा भ्रमणध्वनी, बावीस लाखाचे कंटेनर असा एक कोटी 45 लाख 38 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर (आर्वी, ता. जि. धुळे) शिवारात ही कारवाई करण्यात आली. राज्याचा महसूल बुडून परराज्यातील मध्य भरलेला ट्रक नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या नाशिकच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार आर्वी शिवारात सापळा रचण्यात आला. कंटेनर (क्र. एमएच 12 एलटी-4255) याची तपासणी केली असता गोवा राज्यातील विदेशी मद्य आढळून आले. पथकाने अवैधरित्या वाहतूक करणारा चालक शालू एके रामनकुट्टी (42, रा. असरखंडी, केरळ) व क्लिनर शिवानंद शंकर कट्टीकार (32. रा. बेन कर्नाटक) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पथकाने एक कोटी 23 लाख 37 हजार 920 रुपयांचा मद्य साठा जप्त केला आहे. भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक ए .एस. चव्हाण, महेंद्र बोरसे, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, भाऊसाहेब घुले आदींनी ही कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल व ट्रक मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्कच्या गोदामात ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button