नाशिक : नांदगाव तालुक्यात शिक्ष‌ण विभागात जागा ‘रिक्त’ | पुढारी

नाशिक : नांदगाव तालुक्यात शिक्ष‌ण विभागात जागा 'रिक्त'

नांदगाव : सचिन बैरागी

नांदगाव तालुक्यात शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांच्यासह शिक्षण विभागातील एकूण १५२ जागा रिक्त असून, या रिक्त जागांमुळे पर्यवेक्षणाच्या तसेच संनियंत्रणाच्या‌ कामात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. विज्ञान, सामाजिकशास्त्र, भाषा विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थांचादेखील अध्ययनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्यात २०१७ मध्ये झालेल्या गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परंतु, मुलाखती प्रलंबित आहेत. शिक्षण विभागातील एवढ्या जागा रिक्त असताना पुढील कार्यवाही का होत नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शिक्षण विभागातील रिक्त जागांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालत रिक्त जागांवरील नियुक्त्या लवकरात लवकर भरण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

आमच्या विद्यालयात शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीसाठी शासनाच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे. परंतु, अजूनही या जागा भरण्यात आल्या नाही. तरी लवकरात लवकर या रिक्त जागा भरण्यात याव्या, अशी आमची मागणी आहे. – डाॅ. सागर भिलोरे, अध्यक्ष. म.वि. मंदिर वडाळी बु.

तालुक्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे पालकांच्या अध्यापनासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षक असणे गरजेचेच आहे. शासन स्तरावरून शिक्षक उपलब्ध होताच रिक्त जागेवर शिक्षक दिले जातील.  -प्रमोद चिंचोले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती नांदगाव.

नांदगाव तालुक्यातील रिक्त जागा पुढीलप्रमाणे.

● गटशिक्षण आधिकारी मंजूर पद १, कार्यरत० रिक्त १

●विस्तार अधिकारी मंजूरपदे ६ कार्यरत ३ रिक्त ३

● कनिष्ठ सहायक मंजूरपदे २, कार्यरत २ रिक्त ०

●परिचर मंजूरपदे २, कार्यरत २ रिक्त ०

●केंद्रप्रमुख मंजूरपदे १३, कार्यरत १ रिक्त १२

●मुख्याध्यापक मंजूरपदे ३५, कार्यरत १६ रिक्त १९

●पदवीधर विज्ञान मंजूरपदे ३८, कार्यरत १० रिक्त २८

●पदवीधर समाजशास्त्र मंजूरपदे १४, कार्यरत ५ रिक्त ९

●पदवीधर मंजूरपदे ८५, कार्यरत ३० रिक्त ५५

●उपशिक्षक मंजूरपदे ६२२, कार्यरत ५६१ रिक्त ६१

●एकूण ७६७ कार्यरत ६१५ रिक्त १५२

हेही वाचा:

Back to top button