मालेगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांचा आढावा घेताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत पोलिस अधिकारी.
मालेगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांचा आढावा घेताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत पोलिस अधिकारी.

नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक

Published on

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिकेत पोलिस प्रशासनासमवेत आढावा बैठक होऊन सुरक्षात्मक, नागरी आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेतील त्रुटी निकाली काढण्यावर चर्चा झाली.

प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि छावणी, किल्ला, आयेशानगर, पवारवाडी, आझादनगर पोलिस ठाणे आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या प्रभारी अधिकार्‍यांची बैठक पार पडली. सण – उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बांधकाम, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य आणि अतिक्रमण विभागाच्या नियोजनाची माहिती घेण्यात आली. विभागप्रमुखांना कामामध्ये काही समस्या येत असल्यास, त्यांनी तातडीने याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधून समस्येचे निवारण करून घ्यावे. आवश्यकतेनुसार पोलिस यंत्रणेशी समन्वय साधावा, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच पोलिसांनी गणेशोत्सव कालावधीत शहरातील प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची सूचना झाली. शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, पथदीप व्यवस्था सुरळीत ठेवावी, महादेव घाट व कॅम्प गणेशकुंडावर सोयी – सुविधा ठेवाव्यात शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.

स्वच्छता विभागाने शहरातील स्वच्छता अबाधित राखावी, जंतूनाशक फवारणी करावी, मोठ्या मंडळांच्या ठिकाणी कचरा उचलण्याची व्यवस्था ठेवावी, कचरा संकलन करणार्‍या ठेकेदाराला स्वच्छतेबाबत नियोजन देण्याचेही स्पष्ट करण्यात आले. पाणीपुरवठा सुरळीत राहील आणि आरोग्य विभागात औषधसाठा व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे सांगण्यात आले. बैठकीस पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, दिगंबर भदाणे, संजय गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, मनोज पवार, ज्ञानेश्वर बडगुजर, डी. ए. पाटील, पोलिस उपनिरीक्षक यू. बी. मोहारे यांच्यासह सहायक आयुक्त तुषार आहेर, राजू खैरनार, अनिल पारखे, सुनील खडके, सचिन महाले, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, शहर अभियंता कैलास बच्छाव, नगररचनाकार विश्वेश्वर देवरे, नगरसचिव साजिद अन्सारी, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, जयपाल त्रिभुवन, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news