परभणी : गंगाखेड येथे रेल्वेखाली सापडून युवकाचा मृत्यू

File Photo
File Photo

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड रेल्वे स्थानकाजवळ पनवेल-नांदेड या धावत्या रेल्वेखाली सापडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर बालाजी माळवदे (वय ३५ रा.वेताळ गल्ली) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.१८) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

रेल्वे पोलीस जमादार मुकुंद पराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथे गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नागरिकांना रेल्वे कॅन्टीन नजीक रूळावर युवकाचा मृतदेह दिसला. याबाबत माहिती रेल्वे स्टेशन मास्तर अमृत कुमार यांना देण्यात आली. त्यांनी रेल्वे पोलिसांनी माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news