धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण | पुढारी

धुळे : दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील दुसाने एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा जोतिबा फुले माध्यमिक हरिभाऊ श्यामराव भदाणे कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातील 9 वी इयत्तेतील आरती खैरनार या दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाप्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सोनाली देशमुख व प्राचार्य भरत पतिंग शेलार उपस्थित होते. यावेळी आरतीची आई संगीता खैरनार यादेखील उपस्थित होत्या. तसेच माजी सैनिक दादाभाऊ तुळशीराम भदाणे उर्फ फौजी तात्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी सलग 16 वर्षे सैन्य दलात अविरत सेवा केली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायतींचे संचलन केले. प्राचार्य बी. पी. शेलार यांनी राष्ट्रभक्तीपर विचार मांडले. क्रीडाशिक्षक जी. एस. धनोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button