Nashik Lasalgaon: पिन जनरेट करण्याच्या बहाण्याने घातला लाख रुपयांना गंडा | पुढारी

Nashik Lasalgaon: पिन जनरेट करण्याच्या बहाण्याने घातला लाख रुपयांना गंडा

नाशिक (लासलगाव) वार्ताहर : 

येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये एटीएम पिन जनरेट करण्याच्या बहाण्याने ५६ वर्षीय व्यक्तीस दोघा भामट्यांनी १ लाख ५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी लासलगाव पोलीस कार्यालयात प्रकाश दौलत बोंडे (५६) रा. सुभाष नगर यांनी फिर्यादी दिली आहे.  बोंडे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पत्नीचे कार्ड घेऊन गेले. पत्नीच्या नावावरील एटीएम पिन जनरेट करत असतांना तेथे अगोदरच असलेल्या दोघांनी मदत करण्याच्या बहाण्याने दुसरेच एटीएम कार्ड देऊन सुमारे एक लाख पाच हजार ५५२ रुपयांची रक्कम काढून घेतल्याची घटना घडली.

याबाबत दिनांक ९ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखींविरोधात लासलगाव पोलीस कार्यालयात भारतीय दंड विधान कलम ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button