नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली  | पुढारी

नाशिक : वाघाडीला अचानक आलेल्या पुरात वाहने वाहून गेली 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

गोदावरीला गौरी पटांगण या ठिकाणी येऊन मिळणाऱ्या वरुणा नदीला (वाघाडी) अचानक आलेल्या पुराने वाहने वाहून गेली. यामध्ये एक रिक्षा, एक अल्टो कार ही गोदावरीच्या पाण्यात वाहून गेली. तर एका रिक्षाला वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले असून पूर्व ओसरल्यानंतर क्रेनच्या साह्याने ही वाहने काढण्यात आली.

चामरलेणी डाेंगर भागात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने वाघाडी नदीला अचानक पूर आला. पंचवटीतील गणेशवाडी भाजी बाजाराला लागून असलेल्या वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे गौरी पटांगण येथे पार्किंगसाठी उभी असलेली रिक्षा पाण्यात अडकली व चार चाकी वाहने वाहून गेल्याचे यावेळी सांगण्यात आले. घटनेची माहिती समजताच पंचवटी विभागाच्या अग्निशामक दलाने पथकासह तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी पाण्यात उतरून अडकलेल्या रिक्षाला गौरी पटांगणावरील परमहंस नरसिंग गोपालदासजी समाधी स्थळाच्या एका खांबास बांधून ठेवली. काही वेळाने पूर ओसरताच रिक्षा बाहेर काढण्यात आली. या पुरात एक कार वाहून गेल्याचीही चर्चा होती. यावेळी अग्निशामक विभागाचे विजय गायकवाड, नितीन म्हस्के, डी. पी. पाटील, महेश हेकरे व नागरिकांनी बचाव कार्यात मदत केली.

हेही वाचा:

Back to top button