नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक | पुढारी

नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या भरगच्च कार्यक्रमामुळे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्जविक्रीला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलग दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.6) सुमारे सव्वाशे इच्छुकांनी अर्ज नेले. त्यामुळे दोनच दिवसांत अर्ज विक्रीची संख्या 273 वर जाऊन पोहोचली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार (दि.5) पासून अर्जविक्री व स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. शनिवारी (दि.6) पदाधिकारी व संचालक पदासाठी 120 तर सेवक संचालकांसाठी 7 अशा 127 अर्जांची विक्री झाली आहे. आतापर्यंत पदाधिकारी संचालक पदासाठी 258 तर सेवक संचालक पदासाठी 15 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. मविप्र निवडणूक लढू इच्छिणार्‍या अनेक दिग्गजांनी स्वत: अथवा आपल्या प्रतिनिधींनी मार्फत अर्ज नेले आहे. दुसर्‍या दिवशी अर्ज नेलेल्या दिग्गजांमध्ये माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (मालेगाव), डॉ. सुनील ढिकले (नाशिक), डॉ. आत्माराम कुंभार्डे (चांदवड), राजेंद्र चव्हाणके (सिन्नर), राजेंद्र डोखळे, गौरव वाघ (निफाड), संदीप गुळवे (इगतपुरी), अशोक पवार (कळवण), विश्राम निकम (देवळा) आदींचा समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button