Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे | पुढारी

Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील शिवडी उगांव भागात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी निफाडच्या उत्तर भागातील नागरिकांनी केली आहे.

निफाड तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. दोन दिवसापूर्वी निफाड उगांव रोडवर एका मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता. ही घटना ताजी असतांनाच मंगळवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास शिवडी माळवाडी सोनेवाडी भागात बिबट्याच्या जोडीने जोरदार डरकाळी फोडत सुमारे अर्धा तास ठाण मांडले होते. स्थानिक नागरिकांनी त्वरित जागरुक होत ट्रँक्टर, जीप व मोटारसायकलच्या लाईटद्वारे बिबट्याचा शोध घेतला मात्र तोपर्यंत बिबट्याने दुसरीकडे धाव घेतली. दरम्यान हा बिबट्या की वाघ याबाबत संभ्रम आहे. कारण, त्याच्या शरिरावर वाघासारखे पट्टे दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, अरुण क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय संचालक अँड रामनाथ शिंदे, अशोक शिंदे, गोरख क्षीरसागर, दिलिप शिंदे, सुदाम सानप, नानासाहेब शिंदे, रामनाथ सांगळे, रोशन शिंदे, दिनकर जाधव, जगन्नाथ जेऊघाले, मंगेश शिंदे आदींसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button