नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी | पुढारी

नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि.26) महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड विभागीय कार्यालयांसह काही प्रकल्प आणि रुग्णालयांची पाहणी करून माहिती घेतली.

विभागीय कार्यालयांमधील एक खिडकी योजनेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपआयुक्त प्रशासन मनोज घोडे-पाटील उपस्थित होते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांना मिळत असलेल्या सुविधांबाबत माहिती घेतली.

इंदिरा गांधी रुग्णालयात वैदयकीय अधिकारी डॉ. आरती चिरमाडे यांनी तर बिटको रुग्णालयात डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी आयुक्तांना माहिती दिली. तसेच तपोवन एसटीपी प्रकल्प म्हणजेच मलनिस्सारण केंद्र आणि नीलगिरी बाग येथील जलशुद्धीकरण केंद्राचीही आयुक्तांनी पाहणी केली. अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड कट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली.

हेही वाचा :

Back to top button