Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू | पुढारी

Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
डीपीवर बसलेल्या माकडाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आदर्श गाव कापशी येथे घडली. या गाव शिवारात माकडे, मोर व रानडुकरांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी (दि. 17) शेतकरी तुकाराम भदाणे यांच्या शिवारात डीपीवर एका माकडाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. याबाबत वनविभाग व महावितरण कार्यालयास माहिती कळविल्यानंतर कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मृत माकडाला खाली उतरविले.

वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, वनविभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयदीप भदाणे यांनी केली आहे. यावेळी विजय भदाणे, योगेश भदाणे, महेश भदाणे, नितीन भदाणे, भूषण भदाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button