नाशिक : ठाण मांडून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद ; तीन तास चालला थरार | पुढारी

नाशिक : ठाण मांडून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद ; तीन तास चालला थरार

सातपूर (नाशिक) पुढारी वृत्तसेवा

सातपूर-अशोकनगर रहिवासी परिसरात सकाळपासून ठाण मांडून असलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला वनविभागाने बेशुद्ध करुन जेरबंद केले आहे.

आज शनिवारी सकाळच्या सुमारास अशोकनगर परिसरात विकास काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाथरूमवर (बाथरुमच्या पोटमाळ्यावर) या बिबट्याने ठाण मांडले होते. ही घटना शेजारीच असलेले माजी सभापती योगेश शेवरे यांच्या निदर्शनास आल्याने शेवरे यांनी वन विभागला कळविले होते. घटनास्थळी वनविभागची रेस्क्यू टीम दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार होता. त्यामुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण होते. आज रेस्क्यू करण्यात आलेला बिबट्याच तोच बिबट्या आहे किंवा नाही अशीही चर्चा नागरिकांत आहे.

हेही वाचा :

Back to top button