नाशिक : भोसला सैनिकी शाळेजवळून चंदनाच्या झाडांची चोरी | पुढारी

नाशिक : भोसला सैनिकी शाळेजवळून चंदनाच्या झाडांची चोरी

नाशिक : भोसला सैनिकी शाळेजवळून चोरट्यांनी चंदनाचे दोन वृक्ष कापून नेले. त्यातील एक वृक्षाचे खोड चोरट्यांनी लंपास केले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तू दगडू माळी (45) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी 25 ते 26 जूनदरम्यान शाळेच्या पंडित नेहरू भवन इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील चंदनाचे दोन वृक्ष तोडले. त्यापैकी चंदनाचा एक वृक्ष तोडून नेला, तर दुसरा वृक्ष कापून त्याचे नुकसान केले. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button