जळगाव : इनोव्हाच्या धडकेत दोघे जिवलग मित्र ठार | पुढारी

जळगाव : इनोव्हाच्या धडकेत दोघे जिवलग मित्र ठार

जळगाव : इनोव्हा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जिवलग मित्र जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी (दि. २९) रात्रीच्या सुमारास जामनेर तालुक्यातील सुनसगाव फाट्याजवळ घडला. यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जीवन शिवाजी कोळी (वय २५), विकास संजय पाटील (वय २७) दोघे रा. माळपिंपरी असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवार रात्रीच्या सुमारास सुनसगाव फाट्याजवळ गाडीने जबर धडक दिल्यामुळे दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जीवन कोळी व विकास पाटील दोघे जिवलग मित्र होते. या घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालमसिंग राजपूत, तुकाराम निकम, नाना भोजने, कमलाकर पाटील आदी कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदत केली.

हेही वाचा :

Back to top button