सातारा : वर्ये येथील विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू | पुढारी

सातारा : वर्ये येथील विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा वर्ये (ता.सातारा) येथील प्रकाश निकम यांच्या शेतातील विहिरीमध्ये करंजेपेठ येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मयूर प्रवीण माने (वय 18) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी( दि.२३ जून) दुपारी घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, करंजेच्या पिलेश्वरीनगर येथील असलेला मयूर प्रवीण माने (वय १८) हा वर्ये येथील विहिरीमध्ये पोहण्यासाठी आपल्या मित्रासमवेत आला होता. परंतु त्याला पोहवता येत नसल्याने त्याचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनास्थळाची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी तालुका पोलिसांना कळविले.

विहिरीतील पाण्यातून मृतदेह काढण्याससाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल होऊन त्यांच्या साह्याने युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. संबंधित घटनेचा पंचनामा पोलिसांच्यावतीने करण्यात आला असून याचा अधिक तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.

Back to top button