OBC students : शंभर ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी | पुढारी

OBC students : शंभर ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी केवळ 10 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ओबीसी लोकसंख्येच्या तुलनेत ती फारच कमी असल्याने किमान 100 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळावी, अशी मागणी बर्‍याच वर्षांपासून ओबीसी समाजाची व विद्यार्थी संघटनांची होती. ही मागणी लवकरच पूर्ण होणार असून, आता 100 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळणार असल्याची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक ना. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी महाज्योतीचे संचालक
प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले, डॉ. बबन तायवडे, सिद्धार्थ गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते. बैठकीत महाज्योतीच्या माध्यमातून 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण संचालक मंडळाने एकमताने त्याला मान्यता दिली.

परदेशात शिकण्यासाठी व परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी 200 विद्यार्थ्यांना स्पर्धापूर्व निवासी प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णयसुद्धा महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान, महाज्योतीचे कार्य हे विद्यार्थिभिमुख असून, यापुढेही विविध शासकीय योजना राबविणार असल्याचे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button