धुळे : अखेर पांझरा-कान सहकारी साखर कारखाना सुरू होणार, ‘यांच्यात’ झाला करार | पुढारी

धुळे : अखेर पांझरा-कान सहकारी साखर कारखाना सुरू होणार, 'यांच्यात' झाला करार

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील भाडणे येथील पांझराकान सहकारी साखर कारखान्याबाबत नाशिक येथील स्पर्श शुगर इंडस्ट्रिजचे मालक पवन मोरे यांच्यात व शिखर बँकेत करारनामा झाला.पांझराकान सहकारी साखर कारखाना पुढच्या हंगामापूर्वी निश्चितपणे सुरू होणार असल्याचे संकेत स्पर्श शुगर इंडस्ट्रिजचे मालक पवन मोरे यांनी साक्री येथे पत्रकार परिषदेत दिले.

वार्षिक ५२ लाख रुपये भाड्याने नाशिक येथील स्पर्श शुगर इंडस्ट्रिजने घेतला आहे. २५ वर्षे कराराने हा कारखाना शिखर बँकेने त्यांना दिला आहे. पहिल्या हंगामात ५२ लाख रुपये भाडे असून, दुसऱ्या हंगामापासून एक कोटी रुपये त्यानंतर दोन कोटी रुपये असे टप्प्याटप्प्याने भाडे करार करण्यात आले आहे. कारखाना सुरू करण्यासाठी लवकरच अत्याधुनिक नवीन मशीनरी आणली जाणार आहे. कारखान्याची जुनी मशीनरी कोणत्याही कामात येणार नसून ही सर्व मशीनरी बँकेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. कारखान्याच्या मालकीची जवळपास २९८ एकर जमीन उपलब्ध असून, या जमिनीवर सौरपॅनलसह इतर उद्योगही उभारण्यात येणार असल्याचे पवन मोरे यांनी सांगितले. यामुळे तालुक्यातील बेरोजगारांना उद्योग तसेच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली.

ढोल-ताशे वाजवून जल्लोष …

करारनामा पूर्ण करून तहसील कार्यालयाच्याा आवारात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत फटाके व ढोल-ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. मे. स्पर्श शुगर इंडस्ट्रिज संचलित पांझराकान साखर कारखान्याचे डायरेक्टर पवन मोरे व धनंजय अहिरराव उपसरपंच भाडणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. साखर कारखाना भाडणे येथे जाऊन मशीनरीचीदेखील पूजाअर्चा करून श्रीफळ वाढविण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button