पिंपरी : हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगर मध्यवर्ती केंद्र यांना जोडणारी मेट्रो लाईन अतिशय महत्वाची असल्याने या मार्गिकेवरील सुरक्षाविषयक तरतुदी आणि आपत्कालीन नियोजन यांचा आढावा घेण्यासाठी ताथवडे कास्टिंग यार्ड येथे या फायर सेफ्टी ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी हिंजवडी ते शिवाजीनगर या सुमारे 23 किमी अंतराच्या मार्गावर सुरू असलेल्या पुणे मेट्रो लाईन तीनच्या कामकाजाचा सुरक्षा आढावा घेण्यात आला. मेट्रो उभारणीचे काम सुरू असताना कोणकोणत्या संभाव्य कारणांमुळे आग लागण्याचा धोका असू शकतो, आगीच्या कारणानुसार ती विझवण्याचे विभिन्न मार्ग कोणते, आणीबाणीच्या प्रसंगी अग्नीशमन दलाची प्रत्यक्ष मदत पोचेपर्यंत कंपनीचे कर्मचारी कशा प्रकारची खबरदारी उपाययोजना करू शकतात इत्यादी विविध महत्वपूर्ण बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
पुणे आयटी सिटी मेट्रो कंपनीचे वाहतूक नियमन अधिकारी, सुरक्षा अधिकारी, समन्वय अधिकारी यांच्यासह अग्नीशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी आणि वाहतूक पोलिस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.