Nashik Crime : शहरातील तीन सराईत चोरट्यांना अटक, ‘अशी’ करायचे चोरी…

Nashik Crime : शहरातील तीन सराईत चोरट्यांना अटक, ‘अशी’ करायचे चोरी…
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील अंबड, सातपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, चोरी करणार्‍या तीन सराईत चोरट्यांना अंबड पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून घरफोडी, चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले असून, 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. तीनही चोरटे सराईत असून, त्यांच्याविरोधात खून, खुनाचे प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे गुन्हे दाखल आहेत.

अभिषेक उद्धव विश्वकर्मा (24), करण अण्णा कडुस्कर (23) व ऋषिकेश अशोक राजगिरे (21, तिघे रा. अंबड) अशी संशयितांची नावे आहेत. अंबड पोलिसांनी तपास करून सुरुवातीस करण कडुस्कर यास पकडले. त्याच्याअउकडील चौकशीतून इतर सहकार्‍यांसोबत मिळून घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेशला पेठहून तर मुख्य सूत्रधार अभिषेकला पुणे येथून पकडले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल तपासात त्यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडी, चोरीच्या 13 गुन्ह्यांची व सातपूरच्या हद्दीतील एका चोरीची कबुली दिली. त्याचप्रमाणे पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यांमध्ये चोरलेले सुमारे 28 तोळे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, एक कार, लॅपटॉप व इतर असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, निरीक्षक नंदन बगाडे, श्रीकांत निंबाळकर यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांनी केली.

तिघेही तीन वर्षांपासून फरार
अभिषेक विश्वकर्मा (19) विरोधात, करण कडुस्कर (24) विरोधात व ऋषिकेश राजगिरे विरोधात 21 गुन्हे शहर व ग्रामीणसह उस्मानाबाद, परभणी येथील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

अशा प्रकारे करायचे चोरी…
संशयित चोरटे दिवसभर परिसरात रेकी करून कोणते घर रिकामे आहे व त्यात किमती ऐवज असेल का, याची चाचपणी करत असत. त्यानंतर रात्री किंवा संधी मिळेल, तेव्हा चोरटे घरफोडी करून किमती ऐवज लंपास करत.

सापळा रचत तिघे ताब्यात…
तिघेही संशयित मोबाइलमध्ये सीमकार्ड वापरत नव्हते. वायफायचा वापर करून ठरावीक वेळेतच एकमेकांच्या संपर्कात राहात होते. त्यामुळे त्यांचा शोध लागत नव्हता. तिघेही सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता आहे.

दररोज दहा किमी धावायचे…
पोलिस तपासात संशयित शारीरिकदृष्ट्या सुद़ृढ आढळून आले. पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी संशयित दररोज पहाटे 4 वाजता 10 किमी धावण्याचा सराव करत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news