Nashik Crime : दिंडोरी रोडवर घरफोडी ; सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

Nashik Crime : दिंडोरी रोडवर घरफोडी ; सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (पंचवटी) : दिंडोरी रोडवरील संभाजी नगर परिसरात चोरट्याने ३ ते १३ जून दरम्यान घरफोडी करून सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी प्रविण कुमार मुलचंद राठोड (३९, रा. संभाजीनगर) यांनी म्हसरुळ पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे.

राठोड यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने ३ ते १३ जून दरम्यान चोरट्याने घरफोडी करून घरातील ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २२ हजार रुपयांची रोकड असा तीन लाख १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button