नाशिक : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

File Photo
File Photo
Published on
Updated on

नाशिक (सिन्नर) : तालुक्यातील गोंदे शिवारात शेततळ्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कृष्णा अर्जुन तांबे (15) असे मृत मुलाचे नाव आहे.

कृष्णा मित्रांसोबत दुपारी सोमनाथ येबाजी सोनवणे यांच्या शेत गट नं. 788 मधील शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी आरडाओरड करून मदत मागितली. ग्रामस्थांच्या मदतीने कृष्णाला पाण्यातून बाहेर काढून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी संजय निवृत्ती तांबे यांच्या खबरीवरून नांदूरशिंगोटे पोलिस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news