Nitesh Rane : धर्मापेक्षा नेते मोठे आहेत का? : आ. नितेश राणे यांचा मविआ सरकारवर हल्लाबोल | पुढारी

Nitesh Rane : धर्मापेक्षा नेते मोठे आहेत का? : आ. नितेश राणे यांचा मविआ सरकारवर हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासदार शरद पवार यांच्याबद्दल सोशल माध्यमात कविता पोस्ट करणार्‍या अभिनेत्री केतकी चितळेवर लगेच कारवाई होते. पण, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांना पोलिस अभय देत असून, हा प्रकार सरकार पुरस्कृत आहे का? धर्मापेक्षा नेते मोठे आहेत का, अशा परखड शब्दांत राणे (Nitesh Rane) यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला. संशयितावर योग्य ती कारवाई न झाल्यास यापुढे शांततेत मोर्चा काढणार नाही, असा इशाराच राणे यांनी दिला.

गेल्या महिन्यात सोशल मीडियातून हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वात भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी (दि. 7) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पण, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे कार्यालयात नसल्याने निवेदन द्यायला गेलेल्या राणेंना अर्धा तास तिष्ठत बसावे लागले. अर्ध्या तासाने जिल्हाधिकार्‍यांचे आगमन झाल्यानंतर राणेंनी त्यांच्या हाती निवेदन देत त्यांना धारेवर धरले. भाजपचे नेते व पदाधिकार्‍यांवर पोलिसांचे विशेष प्रेम असून, वेळप्रसंगी आम्हाला जंगलातूनही पकडून आणतात. पण हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह पोेस्ट करणार्‍यांना सरकार अभय देत असून, हे सरकार हिंदूविरोधी असल्याची टीका राणेंनी केली. पोलिसांचा धाक राहिला नसून अधिकारी हे सरकारचे घरगडी असल्यासारखे वागत असल्याचे टीका त्यांनी केली.

पाण्डेय स्वत:ला सिंघम समजतात : नाशिक पोलिसांचे विशेषत: तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांचे आमच्यावर अधिक प्रेम आहे. आजच्या दौर्‍यात पाण्डेय यांची भेट घेण्याची इच्छा होती. पण तत्पूर्वीच त्यांची बदली झाल्याचे समजल्याने भेट अपूर्ण राहिली. पांडे स्वत:ला सिंघम समजतात अशा शब्दांत राणेंनी पाण्डेय यांच्यावर टीका केली .

हेही वाचा :

Back to top button