

नंदुरबार (प्रतिनिधी) :
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शनिमांडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून, प्रतिस्पर्धी भाजपच्या परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनल व आ. डॉ विजयकुमार गावित पुरस्कृत परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत रंगली होती. गेल्या १५ दिवसांपासून प्रचारावर भर देण्यात येत होता. प्रचारात शेतकरी विकास पॅनल वरचढ ठरला.
शनिमांडळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवारी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांनी मतदान करण्यासाठी उत्साह दाखवला. त्यानंतर मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणी अंती माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजयाची मोहोर उमटवित १३ पैकी १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करीत विजयश्री प्राप्त केला.
आमदार कार्यालयात सत्कार
शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचा शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदार कार्यालयावर सत्कार केला. याप्रसंगी माजी जि.प सदस्य डॉ. सयाजीराव मोरे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र गिरासे, पॅनल प्रमुख मुन्ना पाटील, कृउबास माजी सभापती किशोर पाटील, मधुकर पाटील, प्राचार्य सी.पी सावंत, योगेश मोरे, संतोष धनगर, दगा धनगर, सुनील गिरासे, राकेश राजपूत, कृष्णा राजपूत, जगन पाटील आदी उपस्थित होते.
विजयी झालेले उमेदवार असे…
सर्व साधारण खातेदार कर्जदार मतदारसंघ
दिलीप घुगे, नामदेव पाटील, भाऊराव पाटील, संतोष पाटील, हिंमत पाटील, हिरामण माळी, ठाणसिंग राजपूत, सरदारसिंग राजपूत,
इतर मागासवर्गीय प्रवर्ग (राखीव)
शिवाजी पाटील
महिलांसाठी (राखीव) मतदारसंघ
उषाबाई पाटील, हिराबाई पाटील
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग
कृष्णा धनगर
अनुसूचित जाती जमाती
सुरेश ठाकरे