नाशिक : नाशिक देवराई परिसरात बांबूलागवड | पुढारी

नाशिक : नाशिक देवराई परिसरात बांबूलागवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वनविभाग नाशिक पश्चिम व आपलं पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 5) पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘नाशिक देवराई’ येथे आठव्या वनमहोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. देवराईच्या परिसरात यंदा बांबूलागवड करण्यात येत आहे. या महोत्सवात नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

बांबू हा जंगलातील एक महत्त्वाचा घटक असून, पूर्वीपासूनच मानवासाठी उपयुक्त अशी ही जंगलातील वनस्पती आहे. भारतामध्ये बांबूच्या साधारण 140 प्रकारच्या प्रजाती सापडतात. बांबू एक बहुगुणी निसर्गातील वनस्पती आहे. वातावरणामधील कार्बन शोषणाबरोबरच, बांबूच्या वेगवेगळ्या प्रजातींचे विविध प्रकारचे उपयोग होतात. जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीपासून उपजीविकेचे साधन असल्याने बांबूलागवडीला प्राधान्य देण्यात आले होते. ‘योग्य ठिकाणी योग्य प्रजातीच्या बांबूची लागवड व त्यापासून होणारे फायदे’ या विषयावर महाराष्ट्र बांबू विकास मंडळ समन्वयक तथा विभागीय वनाधिकारी (से. नि.) भास्कर पवार व बांबूतज्ज्ञ अजित टक्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड, सुजाता काळे, गिरीश कांगणे, भीमा डहाळे, शशिकांत सानप, मयूर तातार यांच्यासह स्वयंसेवक, वनाधिकारी-कर्मचारी व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button