Nashik : ‘एरिया’चा डॉन आहे’ अशी धमकी देत महिलेचा विनयभंग, नव-याला मारुन टाकण्याचीही दिली धमकी | पुढारी

Nashik : 'एरिया'चा डॉन आहे' अशी धमकी देत महिलेचा विनयभंग, नव-याला मारुन टाकण्याचीही दिली धमकी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

‘तुझा नवरा कोण आहे व तो काय करेल मी त्याला मारेन, मी तुझ्यावर रेप केरेल, तुला व तुझ्या नव-याला मारून टाकेन, ‘मी या ‘एरिया’चा डॉन आहे, अशी धमकी देत एका सराईत गुन्हेगाराने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आडगांव शिवारात घडली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आडगांव पोलिसांनी संशयित सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे. संशयित अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आडगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला बुधवारी (दि. १) सकाळी ११ च्या सुमाराला वृंदावन नगर परिसरात एका ठिकाणी बचतगटाच्या बैठकीसाठी आलेली होती. यावेळी संशयित बंटी कोळी हा या ठिकाणी आला व त्याने पीडित महिलेशी वाद घालण्यास सुरवात केली. यावेळी तो म्हणाला की, तुला या एरियात राहायचे आहे की नाही. बिल्डिंगच्या खाली उतर, मी कोण आहे तुला माहित आहे का, असे धमकावत विनयभंग केला. तसेच, पीडितेच्या नवऱ्याला मारून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संशयित बंटी कोळी हा अद्याप फरार असून, याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संशयित बंटी कोळी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर आडगांव पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button