धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची पाहणी, खा. भामरेंनी दिली ‘ही’ माहिती | पुढारी

धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची पाहणी, खा. भामरेंनी दिली 'ही' माहिती

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या दिवाळी पर्यंत धुळेकर नागरिकांना पाणीपुरवठा करता येईल असे प्रतिपादन खा. डॉ. सुभाष भामरे यांनी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या पाहणी प्रसंगी व्यक्त केले.

अक्कलपाडा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने खा. डॉ. सुभाष भामरे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यात जॅकवेलचे काम 90 टक्के पूर्णत्वास आले असून अक्कलपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम 80 टक्के पूर्ण झालेले आहे. तसेच पाइपलाइनच्या कामात आलेले सर्व अडथळे व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून सदर वितरण वाहिनीचे कामही 90 टक्के पूर्णत्वास आले आहे. कामाची स्थिती समाधानकारक व गतीने करण्यात येत असून याबाबत खासदार भामरे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या संपूर्ण योजनेचे 85 टक्के काम पूर्णत्वास आले असून दिवाळी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत धुळेकर नागरिकांना या योजनेद्वारे नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येेईल असे भामरे यावेळी म्हणाले.

पाहणी प्रसंगी स्थायी समिती सभापती शितल नवले, माजी महापौर प्रदीप करपे, नगरसेवक सुनील बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे कार्यकारी अभियंता निकम, मनपा कनिष्ठ अभियंता उगले, बागुल व ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button