नाशिक : टाकेद देवगाव धरणात युवक बुडाला; दोन दिवसांनंतर मृतदेह पाण्याबाहेर | पुढारी

नाशिक : टाकेद देवगाव धरणात युवक बुडाला; दोन दिवसांनंतर मृतदेह पाण्याबाहेर

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव येथील धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेला युवक धरणात बुडाल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी बुडालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर पाण्यावर तरंगताना आढळून आला.

देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत 12 वाड्या-पाड्यांपैकी जांभूळवाडी येथील युवक दुर्गादास बुधा लचके (२४) शनिवारी (दि. २८) सायंकाळी सहाच्या सुमारास घरातून मासेमारी करण्यासाठी गेला होता. रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही सापडला नाही. दोन दिवसांपासून दुर्गादासचा तपास सुरू होता. अखेर दोन दिवसांनंतर सोमवारी (दि. ३०) सकाळी सातच्या सुमारास दुर्गादासचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मृतदेह घोटी रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस पाटील अशोक जाधव यांनी दिली. दुर्गादास यांच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा, आई-वडील, चार भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा:

Back to top button