नाशिक : रिक्षातून पडल्याने वृद्धाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : रिक्षातून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

नाशिक : रिक्षातून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या गोकुळ नानाजी पगारे (83, रा. आगर टाकळी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते दि. 14 मे रोजी सायंकाळी रिक्षाने गोरेवाडीकडून सामनगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी गोरेवाडी प्रेस क्वार्टरजवळ रिक्षातून पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी (दि.28) मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत नोंद केली आहे.

हेही वाचा :

Back to top button