हनुमान शाश्वत, ज्याला जिथे वाटेल तिथे त्याने पूजा करावी : ना. भुजबळ | पुढारी

हनुमान शाश्वत, ज्याला जिथे वाटेल तिथे त्याने पूजा करावी : ना. भुजबळ

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
जनता महागाईने त्रस्त आहे. शेतकर्‍यांपुढे खूप प्रश्न आहेत. अशात देवांच्या जन्मस्थळाचे पुरावे मागण्याच्या फंदात न पडता, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थान नाही, असेल तर त्याला पुरावा काय, असा दावा किष्किंधाचे महंत आचार्य गोविंदानंद यांनी केला आहे. महंतांच्या वक्तव्यामुळे भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न, असे अनेक प्रश्न असून, त्यावर सरकारचे लक्ष आहे. बाकी हनुमानाचा जन्म कुठे झाला, याला महत्त्व न देता, ज्याला जिथे वाटेल तिथे त्याने पूजा करावी. असे जन्मस्थळाचे पुरावे मागून वाद निर्माण करू नये आणि त्याचे काय पुरावे देणार, असा सवालही ना. भुजबळांनी केला.

हेही वाचा :

Back to top button