नाशिक : शहरातील पंपांवर मिळेना पेट्रोल; इंधनाचा प्रचंड तुटवडा | पुढारी

नाशिक : शहरातील पंपांवर मिळेना पेट्रोल; इंधनाचा प्रचंड तुटवडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून ऑइल कंपन्यांकडून इंधनपुरवठा योग्य पद्धतीने केला जात नसल्याने, शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोलच शिल्लक नसल्याचे बघावयास मिळत आहे. विशेषत: भारत पेट्रोलियम डेपो यांच्याकडे पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. शहरात या कंपनीचे सर्वाधिक पेट्रोलपंप असल्याने, वाहनधारकांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे भारत पेट्रोलियम डेपोकडून डीलर्सला मालाची आगाऊ किंमत दिली आहे. असे असतानाही, इंधनपुरवठा होत नसल्याची माहिती समोर येत आहे. कोविडच्या संकटानंतर आता व्यवहार सुरळीत सुरू झाले असून, इंधनाची टंचाई असल्याने त्याचा परिणाम व्यवहारांवर होताना दिसत आहे. सध्या ऑइल कंपन्यांकडून नफा, तोटा यांचे गणित जुळवून कृत्रिम इंधनटंचाई केली जात आहे, त्याकडे लक्ष देऊन जीवनावश्यक कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई केली जावी, अशी मागणीही आता समोर येत आहे. दरम्यान, नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने संबंधित कंपन्या व डीलर्सना जसा पुरवठा सुरू होता, तसाच पुरवठा केला जावा, अशा सूचना दिल्या जाव्यात, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. अन्यथा वाहनधारकांमधील असंतोष लक्षात घेता, शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असे निवेदनाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button