धुळे : इंदवे वि. का. सोसायटीवर सोनवणेंच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता

धुळे : इंदवे वि. का. सोसायटीवर सोनवणेंच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता

धुळे (पिंपळनेर, ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील इंदवे येथील नानासाहेब उत्तमराव पाटील विकास सोसायटीच्या चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते व साक्री तालुका मार्केट कमिटीचे सभापती पोपटराव सोनवणे यांची सत्ता अभेद्य राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने या निवडणुकीत निर्विवाद यश मिळविले आहे.

इंदवे वि.का. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १३ संचालक निवडून द्यावयाचे होते. त्यासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत माघारीच्या दिवशी सहकार पॅनलचे तीन संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत दहाही जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार मताधिक्याने निवडून आलेत.

विजयी उमेदवारात जिजाबाई पाटील, भगवान जाधव, भरत देवरे, दिलीप पाटील, सिताराम पाटील, सतिलाल भदाणे, संदीप वाघ, दिलीप सोनवणे, साहेबराव सोनवणे, भगवान अकलाडे, कौतिक पाटील यांचा समावेश आहे. तर उत्तम इंदीस, जिजाबाई देवरे, संगिता पाटील हे तीन उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते. या निवडणुकीत पॅनल प्रमुख पोपटराव सोनवणेंसह गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष पंडीत अकलाडे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, मा.सरपंच जितेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे, गोकुळ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील, मा.उपसरपंच लक्ष्मीकांत देवरे, योगेश सोनवणे, महेंद्र सोनवणे, नानाभाऊ अकलाडे, मच्छिंद्र जाधव, चतुर देवरे, भटू ठाकरे, समाधान पवार, अशोक बोरसे पंडित जाधव, रविंद्र सोनवणे, लोटन जाधव, नरेंद्र जाधव, अविनाश देवरे, शुभम जाधव, दादाजी अकलाडे, विनोद अकलाडे, संदीप बोरसे, नंदलाल भदाणे आदींचे सहकार्य लाभले. या निवडणुकीत मतदारांनी गटनेते पोपटराव सोनवणे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.  नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत करून सत्कार केला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news