नाशिक : चालकाला झोप लागल्याने अपघात ; भरधाव बस थेट पोलिस चौकीवर धडकली | पुढारी

नाशिक : चालकाला झोप लागल्याने अपघात ; भरधाव बस थेट पोलिस चौकीवर धडकली

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसला वाडीवऱ्हे फाट्यावर बुधवारी (दि.२५) पहाटे ५.३० वाजता अपघात झाला. लक्झरी बसच्या चालकाला अचानक झोप लागल्याने हा अपघात झाला. भरधाव बस थेट वाडीवऱ्हे फाट्यावर असलेल्या पोलिस चौकीवर धडकली. बसमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने नाशिक गाठले. बसचा चालक आणि क्लीनर पसार झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर रोजच होणाऱ्या अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. बुधवारी पहाटे नर्मदा ट्रॅव्हलची लक्झरी बस (एमएच ०४, जीपी ९९७९) चालकाला झोप लागल्याने अपघातग्रस्त झाली. या बसमध्ये किमान ५० प्रवासी होते. बेजबाबदार बसचालक आणि क्लीनर यांनी हा अपघात होताच पलायन केले. वाडीवऱ्हे पोलिसांत नोंद केली असून, तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

Back to top button